धाराशिव – समय सारथी
उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात शालेय येणाऱ्या शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. काही विद्यार्थी चॉकलेट खाल्याने आजारी पडत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकाराने शिक्षण विभाग सतर्क झाले असुन ज्या शाळेत चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यास, त्याचा पंचनामा करावा आणि विद्यार्थ्यांना चॉकलेलचे वाटप करु नये, अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
आंकाक्षित जिल्हा म्हणुन धाराशिव जिह्यात गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षापासुन बाजरी, नाचणी व ज्वारी, गुळ व अन्य सकस पदार्थापासुन तयार केलेल्या तीन प्रकाराच्या चॉकलेचा पुरवठा जळगावच्या गुणिना सर्व्हिसेस या कंपनीकडून केला जातो. पहिल्या दोन टप्प्याचे वितरण झालेले आहे, तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील चॉकलेटसाठी कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये मागणी करण्यात आली होती परंतु संबंधित कंपनीने शिक्षण विभागाला कसलीही पूर्वकल्पना न देता गेल्या पाच, सहा दिवसात कांही शाळांना चॉकलेट वाटप करण्यात आले. 5 जुलैला बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व तुरोरीच्या ज्ञानेश्वर विद्यालयात मिलेट बार चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या.
येळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी चॉकलेट खाताना अळ्या आढळून आल्या. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षण कार्यालयाला याची माहिती सांगितल्यानंतर केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मैनाक घोष यांनी या प्रकाराची दखल घेऊन मुख्याध्यापकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांवर चॉकलेटच्या पॅकिंगची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना वाटप करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबंधित चॉकलेट खाण्यायोग्य असल्याची मुदत ऑक्टोबर 2025 असताना अचानक अळ्या कशा काय निघाल्या याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.