धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात छावा संघटनेने राष्ट्रवादी विरोधात आक्रमक आंदोलन करीत राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयासमोर पत्ते उधळले व जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर दगडफेक करीत घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी छावा संघटनेच्या 3 ते 4 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन स्तिथी तणावपूर्ण शांततेची आहे. सुनील तटकरे यांचा आज धाराशिव दौरा असुन त्याच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती तिथे छावा संघटनेचे पदाधिकारी आले व विरोधात घोषणाबाजी केली.
कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचा विधिमंडळ सभागृहात रमी पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काल लातुर येथे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केली होती त्याचा आज छावा संघटनाने आंदोलन करीत विरोध केला.