धाराशिव – समय सारथी
नवरात्रीनिमित्त धाराशिव शहरातील ग्रामदैवत धारासुर मर्दिनी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कलायोगी आर्टस्च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक संदेशात्मक भव्य रांगोळीचीbसाकारली जाते, त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रांगोळी साकारण्यात आली असून या रांगोळीचा आकार 360 चौरस फुट इतका असून ही रांगोळी 7 तासांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे, या रांगोळीसाठी 75 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.
रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनकल्याणासाठी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, पाठीशी खंबीरपणे उभी असलेली आई जगदंबा व रक्ताचे पाणी करून स्वराज्याची एक एक मनी ओवणारी मावळ्यांची घोडदौड अशी भव्य रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे
ही रांगोळी कलायोगी आर्टस्चे संचालक राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनात, रिद्धीमा ढेकणे, कार्तिका काकडे, जय पंडित, अभिजित लांडगे, श्रीधर कुंभार या विद्यार्थ्यांनी पूर्वत्वास नेली.