पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट टळली तर जनावरे वाचली, कुपनलिका दिल्या
परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दुष्काळाच्या भीषण संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने मोठा आधार मिळाला आहे. सावंत यांनी स्वखर्चाने दुष्काळग्रस्त भागात नागरिकांचे पिण्याचे हाल होत असल्याचे पाहून पाण्याचे टँकर सुरु केले तर जनावर यांच्यासाठी चारा छावणी सुरु केल्या, या छावणीत जनावरांना मोफत चारा देण्यात आला शिवाय इथे आलेल्या शेतकरी यांची निवासाची व जेवण्याची सोय केली. या चारा छावणी जणु शेतकऱ्यांसाठी एक घर, कुटुंबच बनल्या होत्या, इथे जनावरे आल्याने गोवंशसह जनावरे भीषण दुष्काळात वाचली.
धाराशिव जिल्ह्यात पाऊस न पडल्याने दर 3-4 वर्षाला भीषण दुष्काळ पडतो, या काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे मोठे हाल होतात. प्रशासन नागरिकांच्या मागणीनुसार व नियमात बसत असेल तरच पिण्याच्या पाण्याचे टँकर देते, काही वेळा विहीर कुपनलिका यांचे अधिग्रहण करते मात्र यात वेळ जातो तर कधी मंजुरी दिली जात नाही अश्या वेळी पाणी मिळत नाही, आर्थिक तरतूद व शासकीय निकष यात चारा छावणी सुरु होत नाहीत आणि झाल्या तरी तिथे नियोजनशून्य कारभार असतो. या सर्व बाबींचा विचार व शेतकरी आणि नागरिकांचे होणारे हाल पाहून मंत्री सावंत यांनी स्वखर्चातून पाण्याचे टँकर व चारा छावणी सुरु केल्या.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना, विशेष करुन महिला व लहान मुलांना पायपीट करुन भटकावे लागत असे अश्या वेळी गावात पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. भुम परंडा वाशी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात टँकर व चारा छावणी सुरु केल्याने शेतकऱ्यांची जनावरे वाचवता आली. ज्या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्षय आहे त्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी टाक्या दिल्या, त्यामुळे तहान भागली. चारा छावणीत जनावरांना हिरवा चारा, कडबा, पेंड, पाणी हे जाग्यावर पोहच केले जायचे.
चारा छावणी अनेक शेतकरी मुक्कामी राहत य शेतकऱ्यांसाठी भजनी मंडळ यांच्या माध्यमातून कीर्तनाचे, अध्यात्मिक कार्यक्रम देखील ठेवण्यात आले त्यामुळे एक कौटुंबिक जिव्हाळा व नाते निर्माण झाले.दुष्काळ संपेपर्यंत मंत्री सावंत यांनी भैरवनाथ समुहाच्या माध्यमातून चारा छावणी व टँकर सुरु ठेवले. पालकमंत्री डॉ सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी त्याकाळी याचे उत्कृष्ट नियोजन व कार्यभार सांभाळला होता. काही भागात सावंत यांनी कुपनलिका बोअरवेल देऊन तिथे मोटर, पाईप दिले.