बीड – समय सारथी
महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याच्या चारही बाजूनी मुसक्या आवळल्यानंतर तो सीआयडीसमोर शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात कराड हा फरार असुन त्याचा शोध सुरु आहे. बँक खाते गोठणे, कराड यांच्याशी निगडीत महिला यांची चौकशी व आर्थिक निर्बंध आणण्यास सुरुवात केल्यावर कराड हा अडचणीत आला असुन तो आहे सीआयडी समोर शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीआयडीची 9 पथके व जवळपास 150 अधिकारी, कर्मचारी त्याचा तपास घेत असुन, जवळपास 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. कराड याची पत्नी मंजिली व निकटवर्तीय ज्योती जाधव हिची पण चौकशी करण्यात आली होती.