धाराशिव – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील एका तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी डॉ रमेश लबडे याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासुन डॉ लबडे हा अडीच महिन्यांपासून फरार होता त्याला अखेर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेत अटक केली. लबडे हा बोगस डॉक्टर असुन त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. अवैध गर्भलिंग तपासणी करीत असल्याची चर्चा असुन त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
लबडे याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याची व तो विनापरवाना हॉस्पिटल चालवीत व नशा मुक्ती केंद्राच्या नावाखाली रुग्णावर चुकीचे उपचार करुन आर्थिक लुट करीत असल्याची तक्रार केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लबडे यांच्या हॉस्पिटलची चौकशी केली, चौकशी दरम्यान लबडे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसल्याचे आणि त्याच्या हॉस्पिटलची नोंदणीही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नसल्याचे निष्पन्न झाले, बोगस डॉक्टर लबडे याच्यावर गुन्हा नोंद करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील बोगस डॉक्टर रमेश राजेंद्र लबडे याने एका 22 वर्षीय तरुणीला इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत असतानाच डॉक्टरने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आण या कृत्याचा व्हिडिओही बनवला त्यानंतर आरोपीने पीडितेला एका लॉजमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची आण जीवे मारण्याची धमकी दिली. लबडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 (2), 351 (3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.