धाराशिव – समय सारथी
भारतीय जनता पार्टीचे गेम चेंजेर, गल्ली ते दिल्ली अशी कार्यकर्ते यांच्याशी नाळ, स्नेहसंबंध असलेले भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. ठाकूर यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलचा फोटो बदलला, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत असलेला फोटो पोस्ट केल्यानंतर राज्यसह जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी या फोटोवर भावी खासदार असा उल्लेख करीत त्या पोस्ट शेअर केल्या.
ठाकूर यांनी मुंबई सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर पंकजा मुंडे यांनी शिवपरिक्रमा यात्रेदरम्यान ठाकूर यांची परंडा येथे निवास्थानी जात भेट घेत चर्चा केली होती या घडामोडीनंतर ठाकूर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सोबत फोटो पोस्ट सूचक राजकीय इशारा दिला असल्याची चर्चा सुरु आहे.
धाराशिव लोकसभा जागेवरून शिवसेना शिंदे गट व भाजपात दावे-प्रतिदावे सुरु आहेत. ठाकूर यांचे सहयोगी पक्षाशी सुमधुर संबंध असल्याने ते धाराशिव लोकसभेसाठी भाजपला उत्तम पर्याय ठरू शकतात अशी चर्चा रंगू लागल्या आहेत.