धाराशिव – समय सारथी
गेल्या काही दिवसांपासुन भाजप व शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सुप्त व उघड संघर्ष पहायला मिळत आहे, सोशल मीडियावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
धन्यवाद.. खा ओम.. आम्हाला कळालं.. अश्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आल्या आहेत. आम्हाला सगळं कळालं.. असे यात नमुद आहे मात्र काय कळाले हे गुलदस्त्यात ठेवले आहे. काय कळाले यावरून आता पुन्हा एकदा राजकीय कुस्ती रंगणार आहे. सगळं कसं कोड्यात असले तरी तर्क लावत त्याची उत्सुकता निर्माण केली आहे.
दया कुछ तो गडबड है.. कहना क्या चाहते हो.. अश्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बाळा… नादी लागु नको, रडवीन व बडवीन यानंतर आता ‘आम्हाला कळालं’ हा नवीन अध्याय सुरु झाला आहे.












