धाराशिव – समय सारथी
काही प्रभागात मतदार संख्या निश्चित वाढली आहे, एका व्यक्तीचे एका एका मतदार यादीत 3-3 वेळेस नाव आहे, काही जणांची नावे ही एका पेक्षा जास्त प्रभागात आली आहेत. काही चुका असतील. तर त्या प्रशासनाने दुरुस्त कराव्यात यासाठी भाजपचे नेते दत्ता पेठे यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले आहे. या अर्जावर उबाठा पक्ष सोडून इतर सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. हे आम्ही किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्यावरून जर केले असते तर आम्ही अर्ज दिला असता का? खोटं बोल पण रेटून बोल अशी उबाठा गटाची सवय आहे असे शहराध्यक्ष अमित शिंदे म्हणाले.
भाजपचे शहरात वातावरण पाहता त्यांच्या पायाखालील वाळू सरकली असुन त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्याने काहीही असे आरोप केले आहेत. प्रशासनाच्या चुका आहेत त्यात आमचा संबंध नाही, प्रशासन जबाबदार आहे, भाजपचा यात कोणताही हात नाही असा खुलासा केला. जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, जिल्हा प्रवक्ते तथा शहराध्यक्ष अमित शिंदे, ऍड नितीन भोसले, अभय इंगळे, युवराज नळे, राहुल काकडे, अक्षय ढोबळे, दत्ता पेठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
स्थलांतरीत नावे व इतर बाबीवर आम्ही आक्षेप घेतले असुन आमचा यात काहीही संबंध नाही. प्रशासनाला चुकीची दुरुस्ती करावी लागेल, आम्ही पुरावे देतो त्यांनी चुका दुरुस्ती कराव्यात अशी मागणी करू. सत्ताधारी यांच्या दबावापोटी हे केले असा आरोप महाविकास आघाडीने केला म्हणुन आम्ही खुलासा करीत असल्याची भुमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीकडे कोणताही बोगस मतदार नोंदणीचा पुरावा नाही, पराभव दिसत असल्याने त्या मानसिकतेतुन आरोप करीत असल्याचे ऍड नितीन भोसले म्हणाले.
प्रभाग रचना 2022 साली त्यांच्या काळात झाली असुन त्यावर त्यावेळी व आता सुद्धा आक्षेप नोंदविले होते. आमदार व खासदार यांच्या सांगण्यावरून हे झाले आहे. भाजपच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी व कोर्टात जाणार असल्याचे दत्ता पेठे म्हणाले. ज्या अधिकारी कर्मचारी यांनी ही यादी बनवली आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी पेठे यांनी केली. काही झाले तरी ते आमच्यावर आरोप करीत आहेत, त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.