धाराशिव – समय सारथी
युवासेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे, नगरसेवक राणा बनसोडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुणे येथे प्रवेश घेण्यात आला आहे. धाराशिव शहरात शिवसेना उबाठा गट फोडण्यात भाजपला यश आले असुन आगामी काळात काही जण पक्ष सोडणार असल्याची माहिती आहे. नगराध्यक्षपदाचा ओबीसी उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरल्यानंतर शिवसेना पक्ष फुटीला सुरुवात झाली.
शिवसेना उबाठा गटाचे अक्षय ढोबळे यांनी गटबाजीचा आरोप करीत पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक गटबाजीमुळे मी माझ्या युवा सेना विभागीय सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख (धाराशिव) या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही पदाचा मान राखून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडत आहे. आपण सर्वांनी दिलेला मान व सन्मान व साथ यासाठी धन्यवाद असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हणटले आहे.