धाराशिव – समय सारथी
भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडी राज्य सहसंयोजकपदी धाराशिव येथील दत्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असून सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर यांनी दत्ता कुलकर्णी यांना निवडीचे पत्र देत शुभेच्छा दिल्या. दत्ता कुलकर्णी हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून त्यांनी आजवर अनेक पदावर काम करीत पक्षीय व संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या आहेत.
सिद्धिविनायक परिवार या उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांचे सहकार क्षेत्रात भरीव काम आहे. मल्टीस्टेट बँक,सहकारी रुग्णालय, कारखाना, विमा क्षेत्र यासह अन्य त्यांचे काम व संस्थांचे जाळे राज्यभर पसरले आहे.