भुम – समय सारथी
भुम येथील नागरिकांना आता 2 वेगवेगळी बसस्थानके मिळणार असुन पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी याबाबतची घोषणा केली. गावातील जुन्या बस स्थानक ठिकाणी नवीन इमारत 3 महिन्यात उभारली जाणार असुन नवीन बसस्थानक सुद्धा तयार केले जाणार आहे अश्या प्रकारे 2 बसस्थानक मिळतील. जुन्या बसस्थानक येथे तालुक्यातील बस येतील व नवीन जागेतील बसस्थानक येथे आंतर जिल्हा व बाहेरून येणाऱ्या बस थांबतील त्यामुळे प्रवाशी यांची गैरसोय होणार नाही. प्रथम नवीन बसस्थानकाचे काम केले जाईल त्यानंतर जुन्या जागेतील बसस्थानक काम केले जाईल असे मंत्री सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा करताना जाहीर केले.
विकासाच्या बाबतीत आड याल तर गय केली जाणार नाही, बंद या प्रकारामुळे चुकीचा संदेश जात आहे असे सांगत त्यांनी आंदोलन करणाऱ्याना तंबी दिली. भुम शहरातील नवीन बसस्थानक कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते झाले.
नवीन ठिकाणी बसस्थानक करायला नागरिक व व्यापारी यांचा विरोध आहे त्यामुळे त्यांनी भुम बंद पाळून निषेध केला व मोर्चा काढला. काही नागरिकांनी मंत्री सावंत यांना निवेदन देण्यासाठी अचानक रस्ता रोको केला त्यावेळी मंत्री सावंत यांनी निवेदन स्वीकारले व चर्चा केली.
जुने गावातील बसस्थानक ठिकाणी सुद्धा स्थानक होणार असुन नवीन जागेवर सुद्धा बसस्थानक होणार आहे असे सावंत यांनी जाहीर केले.
नवीन ठिकाणी बसस्थानकाला काही व्यापारी व नागरिक यांचा विरोध आहे त्यामुळे आज भुम बंद केला गेला त्यातच मंत्री सावंत हे शहरात विविध भुमीपुजन कार्यक्रमाला होते त्यामुळे तणावाचे वातावरण होते मात्र मंत्री सावंत यांनी दोन्ही ठिकाणी बसस्थानक होणार असल्याचे जाहीर केले.