बेंबळी – समय सारथी, सचिन खापरे
बेंबळी भागात झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले असुन त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सावळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे.
बेंबळीहुन विठ्ठलवाडी, उंबरेगव्हाण,बामणी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता बंद आहे, अनेक भागात पाणी साठल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असुन शेतकरी आर्थिक नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे.