धाराशिव – समय सारथी
एका 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी निश्चल मधुकर बोंदर ययाचा जामीन अर्ज धाराशिव येथील कोर्टाने नाकारला आहे. आरोपीने केलेले कृत्य हे जघन्य अपराध असुन त्याच्या विरोधात पुरावे आहेत, मुलीचे वय व इतर गोष्टी पाहता तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याने कोर्टाने जामीन नाकारला. विशेष न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जामीन फेटाळला, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बोंदर याची धाराशिव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती, जामीन नाकारल्याने त्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख व ऍड सचिन सुर्यवंशी यांनी सरकार पक्षाच्या वतीने कोर्टात बाजु मांडत जामिनीला विरोध केला. अटकेच्या अर्जाला पिडीत मुलीच्या आईने विरोध केला होता, मुलीचे वडील हे एक पोलिस अधिकारी आहेत.
पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे यांनी या प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असे आवाहन धाराशिव येथील जाहीर सभेत केले होते शिवाय याचा पाठपुरावा खासदार, आमदार या लोकप्रतिनिधी यांनी करावा असे म्हणाले होते, त्यानुसार ते लक्ष देत आहेत. हे प्रकरण विविध अंगाने चर्चेला येत राज्यभर गाजले होते. मुलाला न्याय मिळेपर्यंत कायदेशीर लढा देईल असे जरांगे म्हणाले होते.
आरोपीने ओळखीचा फायदा घेत घरी खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 21 वर्षाच्या तरुणाने बलात्कार केला, मुलीला रक्तस्त्राव व पोटदुखीचा त्रास झाल्याने तिने ही घटना आईला सांगितली त्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करुन गुन्हा नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहिता 64,64(2)(1), 64(2),बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 नुसार आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.