धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद पिटू गंगणे यांचा जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने मंजुर केला आहे. अटकेतील आरोपीपैकी हा पहिला तर गुन्ह्यातील तिसरा जामीन असुन यापुर्वी अलोक शिंदे व उद्या शेटे यांना धाराशिव कोर्टाने अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन 22 जणांना अटक केली त्यातील 21 जन जेलमध्ये आहेत तर 3 जणांना जामीन मिळाला आहे. 14 आरोपी अजूनही फरार असुन पोलिसांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन या गुन्ह्यात विनोद गंगणे हे पोलिसांचे खबरी असुन त्यांच्या टीप नंतर कारवाई करण्यात आली. 6 जुन रोजी गंगणे यांना अटक करण्यात आली होती तब्बल 1 महिन्यानंतर दिलासा मिळाला असुन जेलमधुन मुक्ततेचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयात 8 आरोपींचे अर्ज प्रलंबित असुन धाराशिव येथील. जिल्हा व सत्र न्यायालयात 6 जणांचे असे 14 जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबीत आहेत.
सेवन गटातील शरद जमदाडे हे धाराशिव जेलमध्ये असुन त्यांच्या जामीनावर 11 जुलै तर तस्कर गटातील रणजीत पाटील यांच्या जामीनासह नियमित सुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे. सेवन गटातील जेलमधील आरोपी आबासाहेब पवार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 14 जुलैला होणार आहे. सेवन गटातील फरार आरोपी शामकुमार भोसले यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 11 जुलै तर दुर्गेश पवारच्या अर्जावर 15 जुलैला सुनावणी होणार आहे.
जेलमधील आरोपी राहुल परमेश्वर कदम, संदीप राठोड, संगीता गोळे, अमित आरगडे, यासह फरार आरोपी इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर, विशाल सोंजी पिनू तेलंग, अभिजीत अमृतराव हे जामिनीसाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेले आहेत. अरगडेच्या अर्जावर 11 जुलै, संगीता गोळे, राहुल कदम व संदीप राठोड अर्जावर 24 जुलैला सुनावणी होणार आहे.
फरार आरोपी (14) – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 14 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.