माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांची जेलमध्ये रवानगी, 14 आरोपी फरार
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात तस्कर गटातील एका फरार आरोपीला धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे तर सेवन गटातील एका फरार आरोपीचा जामीन नाकारला आहे. तस्कर गटातील उदय उल्हास शेटे यांचा अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे तर सेवन गटातील जगदीश कदम पाटील यांचा अटकपुर्व जामीन नाकारला आहे. शेटे यांच्या वतीने तुळजापूर येथील ऍड अंगद पवार यांनी युक्तिवाद मांडला. तपास, उपलब्ध पुरावे,कायदेशीर बाबी व युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजुर करण्यात आला. तस्कर गटातील हा पहिला अटकपुर्व जामीन आहे. दरम्यान तस्कर गटातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांची 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची धाराशिव कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
उदय शेटे यांना पोलिसांनी तपासात 25 मार्च रोजी आरोपी म्हणुन नाव निष्पन्न केले होते तेव्हापासुन साडे तीन महिने शेटे फरार होते. राहुल कदम परमेश्वर यांच्या रिमांडमध्ये शेटे यांच्यासह इतर 10 आरोपी नावेपोलिसांनी कोर्टात जाहिर केली होती. उदय शेटे हे पाहिजे असलेल्या 4 गोपनीय आरोपी पैकी एक होते, पोलिसांनी त्यांचेसह मिटू ठाकुर, चंद्रकांत बापु कणे, प्रसाद गोटन कदम ही नावे खुलासा डायरीत अनेक दिवस गोपनीय ठेवली होती, अखेर 25 मार्चला नावे जाहिर केली. उदय शेटे यांच्या विरोधात पुरावे असल्याने त्यांचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले मात्र कोर्टाने त्यांना अटकपुर्व जामीन देत दिलासा दिला आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 22 जण अटकेत असुन 14 जन फरार आहेत तर सेवन गटातील अलोक शिंदे व तस्कर गटातील उदय शेटे या 2 जणांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत.
सेवन गटातील शरद जमदाडे हे जेलमध्ये असुन त्यांच्या जामीनावर 9 जुलै तर तस्कर गटातील रणजीत पाटील यांच्या जामीनासह नियमित सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. सेवन गटातील जेलमधील आरोपी आबासाहेब पवार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 10 जुलैला होणार आहे. जेलमधील आरोपी विनोद गंगणे राहुल परमेश्वर कदम, संदीप राठोड, संगीता गोळे, अमित आरगडे, यासह फरार आरोपी इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर, विशाल सोंजी पिनू तेलंग, अभिजीत अमृतराव हे जामिनीसाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेले आहेत.
फरार आरोपी (14) – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 14 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.