धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील चित्रा ताई पाटील हत्याकांडातील संशयीत आरोपी ओम निकम याला धाराशिव कोर्टाने जामीन दिली असल्याची माहिती ऍड अमोल वरुडकर यांनी दिली. उपलब्ध कागदपत्रे व ऍड वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद गाह्य धरून कोर्टाने जामीन मंजुर केला. गुन्ह्यात आरोपीला कशाप्रकारे गोवण्यात आले आहे व तसे पुरावे नाहीत हे कोर्टासमोर मांडले. अटक केल्यापासुन निकम हा धाराशिव कोर्टात होता.
संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांची आई एकत्र राहत होते, त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे, त्या नेहमी ते सोने वापरत असत. शेजारील राहणारा 21 वर्षीय ओम निकम हा नेहमी घरी यायचा, त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै 25 रोजी चित्रा ताई घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे तेव्हा त्या ओम निकम सोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली, पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा ताईचा मृतदेह सापडला. ओम याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सपोनि नामदेव मद्दे यांनी तपास केला.











