धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या बोगस गुंठेवारी प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, तत्कालीन नगर अभियंता भारत विधाते, कवडे व लिपीक गोरोबा अवचार या चारही आरोपीना अटकपूर्व जामीन मंजुर झाला असल्याची माहिती ऍड विशाल साखरे यांनी दिली. न्यायाधीश किरण बागे पाटील यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना दिलासा दिला.
सहायक नगर रचनाकार मनोज कल्लूरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 409, 166, 34 सह आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड करीत आहेत.
धाराशिव नगर परिषद येथे 6 जुलै ते 23 नोव्हेंबर या काळात बोगस गुंठेवारी केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला होता. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशी समिती गठीत केली होती त्यात अनेक गैरप्रकार समोर आले. जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही मुख्याधिकारी वसुधा फड या गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करीत होत्या.