लातूर – समय सारथी
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे..बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली मात्र ते सुदैवाने बचावले असुन त्यांच्यावर सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली.आपल्या स्वतःच्या घरातच त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळी झाल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली व सध्या त्यांची प्रकृती गंभीर ते प्रतिसाद देत असल्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक हनुमंत किणीकर यांनी सांगितल आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.बाबासाहेब मनोहरे यांनी यापूर्वी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. लातूर महानगरपालिकेत ते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते नंतर बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते.