धाराशिव – समय सारथी
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळी डोक्याला लागल्याने त्यांच्या मेंदूला इजा झाली होती त्यामुळे मुंबई येथे त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणार होत असुन ते उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आत्महत्या प्रयत्न करण्यापुर्वी पती पत्नीत घरासमोरील पोर्च मध्ये वाद झाला होता, त्यावेळी मनोहरे यांनी मद्य प्राशन केले असल्याचे वैद्यकीय अहवालातुन समोर आले आहे. वाद सुरु असताना त्यांना एक फोन आला व त्यानंतर ते तणावात होते, तो शेवटचा फोन कोणाचा ? आयुक्त मनोहरे यांनी गोळी का झाडली याचा तपास सुरु आहे.
मनोहरे यांनी आपल्या स्वतःच्या घरातच डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळी झाडल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक हनुमंत किणीकर यांचे प्रयत्न कामाला आले मात्र मेंदूच्या पुढील शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याने त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले. त्यासाठी लातुर व मुंबई येथे एअर लिफ्ट विमानाने ग्रीन कॅरीडोअर करुन नेण्यात आले, ते डोळ्याची व हाताची हालचाल करुन सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. बाबासाहेब मनोहरे यांनी यापूर्वी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. लातूर महानगरपालिकेत ते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते नंतर बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते.