धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात चाललंय तरी काय असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असुन पवनचक्की माफियाचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. पवनचक्कीचा गुंडाकडून तक्रारदार शेतकऱ्याला जबर मारहाण करण्यात आली असुन तब्बल 20 पेक्षा अधिक मिनिट हॉकीच्या स्टीकने मारहाण करण्यात आली, शेतकरी गंभीर जखमी असुन बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रारी करून उपोषण केल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली आहे. भुम तालुक्यातील घाटनांदुर येथील बजरंग गोयेकर असे शेतकऱ्याचे नाव असुन ते माजी सरपंच देखील आहेत, यात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती टळली.
भूम तालुक्यातील सुकटा येथील घटना असुन सुकटा शिवारात पवनचक्की कंपनीकडून अवैध (मुरुम ) उत्खनन चालू असताना माजी सरपंच बजरंग गोयेकर हे त्या ठिकाणी गेले असता त्यांना फोटो का काढले म्हणत पवनचक्की माफीया यांनी सांभाळलेल्या गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. धाराशिव जिल्ह्यात अश्या घटना वारंवार होत असुन महसुल व पोलिस विभागाचा यावर अंकुश नाही.