वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी
धाराशिव – समय सारथी
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणी चेअरमन रोहितराज विजय दंडनाईक यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर आज न्यायाधीश किरण बागे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. पोलिसात 10 लाखांचा प्राथमिक गुन्हा नोंद असुन त्यातील 50 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली आहे मात्र तपासात घोटाळ्याचा आकडा हा जवळपास 3 कोटी 50 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणात तत्कालीन व्यवस्थापक दीपक देवकते व संचालक हरिश्चंद्र शेळके यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या 3 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. व्यवस्थापक देवकते हे चेअरमन विजय दंडनाईक यांच्या आदेशाने बँकेचा कारभार हाकत होते त्यामुळे त्यांची या घोटाळ्यात व आर्थिक कारभारात महत्वाची भुमिका आहे.कर्ज मंजुर, वितरणसह अनेक कागदपत्रावर देवकते यांच्या सह्या असुन ते या घोटाळ्याची पोलखोल करू शकतात, देवकते यांच्याकडे त्यावेळी तिजोरीच्या चाव्या होत्या.
वसंतदादा बँक घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार चेअरमन विजयकुमार दंडनाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव कोर्टाने फेटाळला असुन ते गुन्हा नोंद झाल्यापासुन फरार आहेत त्यामुळे पोलिस त्यांना आता तरी अटक करणार का ? हा प्रश्न विचारला जात आहे. वसंतदादा बँकेचे सर्व संचालक, व्यवस्थापक फरार आहेत.
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंद केलेल्या तक्रारदार वाकुरे यांनी यापुर्वी रोहितराज दंडनाईक यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. त्यामुळे एकाच फसवणूकीच्या गुन्ह्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंद होऊ शकत नाहीत त्यामुळे गुन्हा रद्द करावा अशी भुमिका आरोपीचे वकील ऍड मिलींद पाटील यांनी मांडली आहे तर तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या आजवरच्या तपासात फसवणूकीचा आकडा साडे तीन कोटी कोटीच्या पुढे गेला आहे शिवाय मूळ एफआयआर गुन्ह्यात वाकुरे सोडून अन्य लोकांची तक्रारदार म्हणून नावे आहेत तर चौकशीत अनेक नवीन तक्रारदार समोर आले असुन त्यातील काहीनी कोर्टात शपथपत्र व वकीलपत्र दाखल केले आहे. प्रत्येकाने वेगळा गुन्हा व कोर्टात जायचे का ? अशी बाजु गुंतवणूकदार यांचे वकील ऍड अजित खोत यांनी मांडली आहे. सरकारी वकील शरद जाधवर यात काम पाहत आहेत.
एकंदरीत अनेक कायदेशीर तांत्रिक मुद्दे व 3 कोटी 50 कोटी फसवणूक आकडा यावर कोर्ट काय निर्णय देते याकडे गुंतवणूकदार यांचे लक्ष लागले आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यात 28 जुलै 23 रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तर अरविंद पतसंस्था घोटाळ्यात 1 सप्टेंबर 23 रोजी गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. कलम 420,409,34 सहमहाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. या घोटाळ्यात दंडनाईक यांचा संचालक मुलगा पृथ्वीराज,पत्नी सुरेखा असे कुटुंब अडकले असुन त्यांचा जामीन छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला असुन तेही सध्या फरार आहेत तर पोलिस त्यांच्या कायम तपासावर व मागावर आहेत.