धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी जहरी टीका केली. ओमराजे निंबाळकर उमेदवार की गुन्हेगार अश्या आशयाचे व्हाटसअप स्टेट्स ठेवत अर्चना पाटील यांनी टीका केली आहे. उबाठा लोकसभा उमेदवाराची खरी ओळख उमेदवार की गुन्हेगार असे त्यांनी म्हणले असुन यानिमित्ताने पोस्टर वॉर सुरु झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा नराधम व ओमराजे निंबाळकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्याचा दाखला देत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये खासदार ओमराजे यांचा नराधम असा उल्लेख करीत ओमराजे यांना डीवचले आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर होण्या आधीच डॉ पाटील निंबाळकर यांच्यात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने 12 एप्रिल 2019 रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांने आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जप्त केलेल्या चिट्टीत त्याने तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी 2010 या साली कर्ज घेतले होते मात्र कारखानयाने पैसे न भरल्याने तणावाखाली व दुष्काळामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते त्यांनतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसात गुन्ह नोंद करण्याची तक्रार केली होती त्यानुसार पोलिसांनी तब्बल 5 महिने तपास केल्यांनतर ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य 5 जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा व फसवणूकीचा गुन्हा ढोकी पोलीस ठाण्यात नोंद केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती , कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांच्या जमिन लिलावात काढली होती , या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली . यावेळी ढवळे यांच्या खिशात २ वेगवेळ्या चिट्ठ्या सापडल्या त्यातील एका चिट्ठीत त्यांनी आत्महत्येस ओम राजे निंबाळकर व वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख होता तर दुसऱ्या चिट्ठीत 13 शेतकऱ्यांनी तेरणा कारखाना बाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भेट झाली नाही असे सांगत व्यथा मांडल्या आहेत . त्याचबरोबर शिवसेनेचे लोकसभा उमेदवार ओम राजे याना मतदान न करण्याचे आवाहन होते.
शेतकरी ढवळे आत्महात्येचा मुद्दा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता , शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.