धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असुन अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी केशेगाव व तेर या 2 गटातुन भारतीय जनता पक्षाकडुन उमेदवारी अर्ज भरला आहे. यापुर्वी त्या केशेगाव या गटातून जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यानंतर उपाध्यक्ष पदावर काम केले. पक्षाने संधी दिल्यास अध्यक्ष पदावर काम करून जनतेची सेवा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. माऊली असे म्हणत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अध्यक्ष पदावर दावा केला आहे.
मी यापूर्वी जिल्हा परिषदेत काम केले आहे,उपाध्यक्ष पदाचा अनुभव आहे, पक्षाने अध्यक्ष पदाची संधी दिली तर अध्यक्ष पदाच्या खुर्चीला व जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे महिलेसाठी राखीव आहे. भाजप त्यांना कोणत्या गटातून उमेदवारी देणार हे पाहावे लागेल.












