तुळजापूर – समय सारथी
भारतीय जनता पार्टीकडून तेर जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुळजापूर येथे जगदंबा आई तुळजाभवानीच्या पावन चरणी मनोभावे नतमस्तक झाले.
आईच्या कृपेने आणि आशीर्वादाने जनसेवेचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असून, तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकास, न्याय व सन्मान पोहोचवण्याचा संकल्प या दर्शनाने अधिक दृढ झाला. जनतेने दाखवलेल्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर ही निवडणूक पूर्ण श्रद्धेने लढवून, सामान्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी प्रतिज्ञा यावेळी आईच्या चरणी केली.











