धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात समाविष्ट करावे अशी मागणी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना नामदार करण्याचा शब्द दिला होता, त्या वचनाची आठवण करुन दिली जात आहे. क्या हुआ तेरा वादा, दिलेला शब्द पाळा असे म्हणत धाराशिव येथे शिवसैनिक तथा कावळेवाडी गावचे सरपंच ऍड अजित खोत यांनी सावंत यांना मंत्री करा अशी साद घातली आहे. छगन भुजबळ यांना मंत्री केल्यानंतर खोत यांनी सावंत यांना देखील मंत्री करावे अशी मागणी केली आहे.
डॉ तानाजीराव सावंत यांना तुम्ही आमदार करा, मी त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझ्यावर असेल असे वचन शिंदे यांनी परंडा येथील प्रचार सभेत मतदारांना दिले होते, त्याची आठवण करुन दिली जात आहे.
मंत्री सावंत यांनी आरोग्य विभागात अनेक योजना आणल्या जागरूक पालक सुदृढ बालक, आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्रचे, आरोग्याची वारी पंढरीच्या दारीचे जागतिक रेकॉर्ड झाले. शिवजल क्रांती ते उद्योग, आरोग्य, हरीत क्रांती केली. त्यांच्या काळात हजारो कोटी रुपयांचा निधी मिळाला असुन त्यातून अनेक विकासकामे झाली आहेत त्यामुळे त्यांना मंत्री करावे अशी मागणी होत आहे.