धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील 492 ग्रामपंचायत, नगर परिषद क्षेत्रात 540 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहिरात प्रसिद्ध केली असुन त्याचे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुकांनी मोठी गर्दी केली. 15 सप्टेंबर हा ऑफलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने झुंबड उडाली.
निवड प्रक्रियेसाठी 100 गुण निर्धारित केले असुन त्यातील 20 गुण मुलाखतीसाठी असणार आहेत. पदवीधर 30, पदव्युत्तर 25 व सीएससी केंद्र असल्यास 25 असे 80 गुण आणि मुलाखतचे 20 असे 100 गुण असणार आहेत.
16 सप्टेंबरला आलेल्या अर्जाची माहिती जिल्हा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असुन 19 सप्टेंबरला पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यावर 23 सप्टेंबर पर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. 24 सप्टेंबरला पात्र अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करता येणार आहे. 25 व 26 ला पात्र अर्जदार यांची मुलाखत घेऊन त्यानंतर निवड झालेल्या उमेदवार यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
धाराशिव तालुक्यातील 80 ठिकाणी 95, तुळजापूर 85 ठिकाणी 92, कळंब 66 ठिकाणी 71, वाशी 33 ठिकाणी 34, भुम व परंडा येथे प्रत्येकी 59 ठिकाणी 60, उमरगा 69 ठिकाणी 81 व लोहारा तालुक्यात 41 ठिकाणी 47 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.