धाराशिव – समय सारथी
तुळजापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नरवडे यांना तपासातील निष्काळजीपणा भोवला असुन पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी ठोस भुमिका घेत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. पोलीस विभागात जबाबदारी आणि शिस्त यांना प्राधान्य दिले जाईल, तसेच अशा निष्काळजीपणास कोणतीही सहनशीलता दाखविण्यात येणार नाही, अशी कडक भुमिका जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केली आहे.
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कचरु नरवडे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस ठाणे तुळजापूर येथील गुरनं 93/2025 कलम 103(1),3(5) भा.न्या.सं अन्वये दाखल गुन्ह्यातील प्रकरणात निर्धारित 90 दिवसांच्या कालावधीत चार्जशीट सादर करण्यात निष्काळजीपणा दाखविला. त्यांच्याकडुन जबाबदारीतील कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले असुन, ही बाब त्यांच्या कर्तव्यातील हलगर्जीपणाचे द्योतक आहे असे खोखर यांनी सांगितले.