धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे विक्रीसाठी येणारे ड्रग्ज पोलिसांनी पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली असुन तुळजापूर शहरात ड्रग्जची खुलेआम विक्री होत असलेल्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. ड्रग्ज प्रकरणात 3 आरोपीना अटक केली असुन ते अट्टल गुन्हेगार असुन न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज प्रकरणात मुंबई येथील एका महिलेचे नाव समोर आले असुन हे ड्रग्ज तुळजापूर कोणाला विकले जाणार होते याचा तपास पोलीस करीत असुन ड्रग्ज खरेदी करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत.
तुळजापूर शहरांमधील राजकीय नेते,व्यापारी,पुजारी व सर्व शहरवासीयांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी केले आहे. तुळजापूरमधील ड्रग्स व अमलीपदार्थ संदर्भात मिटींगचे आयोजन श्री तुळजा भवानी पुजारी मंडळात येथे आज सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. हे लवकर रोखले पाहिजे नाहीतर ही आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही असा नारा तुळजापूरकरानी दिला आहे.