धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मराठा आंदोलनाची धग कायम असुन 16 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंद व रस्ता रोको केला जाणार आहे. धाराशिव शहर हे बेमुदत बंद असणार असुन वाशी, भुम, तुळजापूरसह अन्य ठिकाणी बंदची घोषणा करण्यात आली आहे तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ता रोको, चक्काजाम व अन्य प्रकारे आंदोलन केले जाणार आहे.
मराठा आरक्षण अंमलबजावणी व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज आता रस्त्यावर उतरला असुन त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. सरकारने घोषणा केली मात्र अंमलबजावणी न केल्याने सरकारने फसवणूक केल्याचा आरोप आंदोलक करीत असुन आक्रमक पवित्र्यात आहेत.