धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील नागरिकांनी रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. धाराशिव शहरासाठी 140.58 कोटींचा निधी मंजूर होऊन त्याची टेंडर प्रक्रिया होऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.यामध्ये 59 रस्त्यांच्या कामांचा समावेश असून,त्यांची लांबी एकूण 26 किमी आहे. मात्र, दहा महिने उलटूनही या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.
शहरातील नागरिकांचा रोष व्यक्त करत हे आंदोलन केले यावेळी धाराशिव शहरातील मुख्य असणारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दोन तासापासून अडवून धरला होता त्यानंतर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.