धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहर मंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे यांची तर लोहारा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे यांची निवड पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी महत्वाची ठरणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी ही निवड केली आहे. शिंदे यांना प्रशासकीय व संघटनात्मक कामाचा अनुभव असून, पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय असून त्यांचा पक्ष कार्यातील सातत्यपूर्ण सहभाग लक्षवेधी ठरला आहे .या निवडीमुळे भाजपच्या संघटनात्मक कार्याला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहेत.