धाराशिव – समय सारथी
सन्मानजनक युतीही सगळीकडे व्हायला हवी, ग्रामविकास मंत्री गोरे धाराशिवचे संपर्क मंत्री आहेत तर मी तिथे सोलापूरला संपर्क मंत्री आहे. आमच्यात समन्व्य आहे. जयकुमार गोरे, आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माझी मंगळवारी कॅबिनेट बैठकीनंतर भेट व चर्चा झाली. कोणताही तणाव नसुन जिल्हा परिषद, नगर परिषद व इतर निवडणुका महायुती म्हणुन लढू असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
भाजप मेळाव्यात गोरे यांनी सन्मानजनक युती न झाल्यास स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता त्यावर पालकमंत्री म्हणाले की आमच्या चर्चा गाठीभेटी सुरु आहेत.
महायुती बाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल मात्र आपण गाव पातळीवर काही बोलु नका, त्यांची मदत होऊ शकते. आपण स्वतः लढू शकतो ती ताकत भाजप पक्षात आहे मात्र महायुतीमध्ये आपण मुख्य पक्ष आहोत त्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे. मित्र पक्षांना तातडीने उत्तर देऊ नका, संयम राखा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल मात्र विरोधकांना सडेतोड उत्तर द्या,असेही जयकुमार गोरे म्हणाले होते.