धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघासाठी महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसुन ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. शिवसेना पक्षात प्रवेश करुन अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. अजित पिंगळे हे भाजपचे तालुका अध्यक्ष असुन ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या जवळचे मानले जातात, त्याच्यासाठी आमदार पाटील हे विशेष प्रत्यनशील आहेत. पालकमंत्री डॉ सावंत यांच्याशी पिंगळे यांचे सख्य आहे. पिंगळे यांनी 2019 साली अपक्ष निवडणुक लढवली होती त्यांना त्यावेळी 20 हजार 570 मते पडली होती, त्यांचे शिटी हे चिन्ह होते. नुकतेच पिंगळे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती.
शिवसेना शिंदे गटाची जागा असताना आयात उमेदवार याला शिवसैनिक व मतदार स्वीकारणार का हे ही महत्वाचे आहे, त्यांच्या नावाची चर्चा होताच नाराजीचा सुर सुरु झाला आहे. शिवसेनेकडुन अधिकृत घोषणा अजुन झाली नसुन सुधीर पाटील, धनंजय सावंत, विक्रम सावंत, सुरज साळुंके, शिवाजी कापसे यांच्यासह अनेक जण तगडे उमेदवार इच्छुक आहेत त्यात कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.