कळंब – समय सारथी ( अमर चोंदे )
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण पोलिसांनी उघड केला आहे. पोलिसांनी आरोपीस पकडून 27 लाख 78 हजार रुपयाची अफुची झाडे ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला.
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी संभाजी उर्फ बंडू भीमराव हिलकुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गट नंबर 119 व 121 मधील शेतामधील उसामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावली होती. शिवशंकर चोपणे पोलीस उपनिरीक्षक शिराढोण यांच्या फिर्यादीवरून आरोपी संभाजी हिलकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन,कळंब उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण पोलिस नेरकर हे तपास करत आहेत. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक तांबडे, खामसवाडी बीट अंमलदार राठोड व इतर कर्मचारी सहभागी होते.