धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील अवैध कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात आला असुन इथे गोवंश हत्या व कत्तल केली जात असल्याने धाराशिव शहर पोलीस व नगर परिषदेने कारवाई केली आहे. धाराशिव शहरात करण्यात येत असलेली जनावरांची कत्तल वारंवार कारवाई करून देखील व सूचना तसेच कारवाई करून देखील थांबत नव्हत्या. विशेष म्हणजे गोवंश कत्तल करण्यास बंदी असताना देखील गोवंशीय जनावरांची देखील मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती.
आठवड्यातून दोन ते तीन वेळेस पोलीस प्रशासन या ठिकाणी जाऊन गोमास व विक्रीसाठी जाणाऱ्या वाहनास जप्त करून संबंधितांना अटक करून कारवाई जात होती. मात्र या कत्तली करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही त्यामुळे वैतागलेल्या पोलीस व नगर पालिका प्रशासनाने चौधरी द्या कारवाई करण्याचा निर्णय घेत खिरणी मळा व रसूलपुरा या परिसरात अनधिकृत खास जनावरांच्या कत्तलीसाठी उभारण्यात आलेले कत्तलखाने जेसीबीच्या साह्याने अक्षरशः जमीनदोस्त करून त्यांचा नायनाट केला आहे त्यामुळे परिसरात असलेली व होणारी दुर्गंधी देखील यामुळे नष्ट होणार असून यापुढे अशा प्रकारची कृती करण्यासाठी कोणीही धजावणार नाही. ही कामगिरी धाराशिव शहर पोलीस ठाणे प्रमुख शकील शेख व नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. ही कामगिरी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, एपीआय अंभोरे, पीएसआय संदीप ओहोळ, पीएसआय अक्षय डिघोळे यांच्यासह पोलीस अंमलदार व नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या. कर्मचारी यांनी केली यावेळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगर्डसह नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.