धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत आरोपी असलेल्या पुजाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदीर संस्थानने घेतला आहे. ड्रग्ज तस्करीत आरोपी असलेल्या पुजाऱ्याना कायम स्वरूपी मंदीर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी या मुद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर तुळजाभवानी मंदीर संस्थान ऍक्शन मोडवर आले आहे.
ड्रग्ज तस्करीत अडकलेल्या काही आरोपी पुजाऱ्यामुळे तुळजाभवानी मातेची बदनामी होत आहे, शिवाय देवीचे पवित्र्य राखले गेले नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी डॉ गोऱ्हे यांच्याकडे तुळजापूर येथील दौऱ्यात केल्या होत्या त्यानंतर त्यांनी पोलिस व तुळजाभवानी मंदीर प्रशासन यांची एक बैठक घेत कारवाई करण्याचे आदेश दिले. ड्रग्ज तस्करीत आतापर्यंत 35 जन आरोपी असुन जवळपास 80 जणांना चौकशीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. 35 आरोपी व चौकशीत निष्पन्न होणाऱ्या पुजाऱ्यावर तुळजाभवानी मंदीर संस्थान देऊळ ए कवायत कायदा नुसार मंदीर प्रवेश बंदीची कारवाई करणार आहे. ही मंदीर प्रवेश बंदी ही कायमस्वरूपी असणार आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थान ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या पुजारयांची नावे लेखी पत्र देऊन मागणार आहे, जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या आदेशाने पुढील कारवाई येत्या 3-4 दिवसात केली जाणार आहे.