धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची 19 दुकानावर मोठी कारवाई केली आहे, 2 कृषी दुकानाचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत तर 12 दुकानाचे परवाने निलंबित व 5 केंद्राना सक्तीची ताकीत दिली आहे. नियमित तपासणीत अनियमितता त्रुटी सापडून आल्याने जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी ही कारवाई केली आहे.साठा न जुळणे, पॉज मशीन न ठेवणे, शेतकऱ्यांना पावती न देणे यासहं अन्य त्रुटी असल्याने कारवाई करण्यात आली आहे.