धाराशिव – समय सारथी
पगार व टीए बील काढण्यासाठी सहकारी कर्मचारी यांच्याकडुन लाच घेताना एकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50 वर्षे) पॅरामेडिकल वर्कर ( कंत्राटी), सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग), सेंट्रल बिल्डिंग यांना 15 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
तक्रारदार हे आरोग्य विभाग, लोहारा येथे पॅरामेडिकल वर्कर (कृष्टरोग) या पदावर नोकरीस असुन तक्रारदार यांचा फेब्रुवारी व मार्च सन 2025 चा पगार तसेच सन 2023 -2024 मधील टी. ए. बिल प्रलंबित होते. यातील आलोसे याने तक्रारदार यांचे पगार बिल व टी ए बिल हे डॉ. कोरे व सांखिकी सहाय्यक माळी यांना सांगून काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच रकमेची मागणी करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पंचासमक्ष तडजोडीअंती पहिला हप्ता 15 हजार रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले व घेताना रंगेहात पकडले. आरोपीची घरझडती सुरु आहे.
आरोपीविरुद्ध कलम 7 अ, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 अन्वये पोलीस ठाणे आनंदनगर, जि. धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अंमलदार- नेताजी अनपट, सचिन शेवाळे, विशाल डोके, नागेश शेरकर, शशिकांत हजारे, प्रकाश भोसले, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता. पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे पोलीस उप अधीक्षक यांनी काम पाहिले.