धाराशिव – समय सारथी
नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 जणींना अटक करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तुळजापूर कार्यालयातील कनिष्ठ सहायक मई बळीराम खांडेकर व चिंचोली येथील अंगणवाडी सेविका सोनाली संदीप कदम या दोघींना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यांनी 15 हजार लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 10 हजार लाच घेताना अटक केली.
तक्रारदार यांचे पत्नीचे चिंचोली येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.