धाराशिव – समय सारथी
जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपीक दयानंद पांडुरंग चव्हाण यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 25 हजार घेताना रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार हे कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सचिव आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी मिळणेकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे सभापती यांचे स्वाक्षरीने जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव येथे अर्ज केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी आदेश देण्याकरीता यातील आलोसे दयानंद चव्हाण याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50 हजार रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 25 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे आनंदनगर, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, नागेश शेरकर यांचा समावेश होता.