धाराशिव – समय सारथी
खुनाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 2 लाख रूपयांची लाच स्वीकारताना एका सहायक पोलिस निरीक्षकासह 2 पोलिस हेडकॉनस्टेबल लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, सोलापूर व पुणे येथील पथकाने ही कारवाई केली.
या लाचखोरी प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 10 तोळे सोन्याच्या कड्यासह 5 लाख रुपये घेतले त्यानंतर पुन्हा 5 लाखांची मागणी केली मात्र तडजोड करून 2 लाख स्वीकारताना रंगेहात पकडले अशी सूत्रांची माहिती आहे. अनेक लोकांना फोन करून अश्याच प्रकारे धमकी देऊन त्यांच्याकडुन पैसे घेतल्याचा आरोप असुन त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलिस ठाण्यात अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली असुन त्याला पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी दुजोरा दिला आहे.
एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी या अधिकारी यांनी यापुर्वी 5 लाख घेतले त्यांनंतर पुन्हा पैशाची मागणी केली. संबंधित अधिकारी यांनी गुन्ह्यात अडकवू असे सांगत अनेक लोकांना बोलावून लाखो रुपये उकळले असल्याची प्राथमिक माहिती असुन पोलिस त्याचा तपास करीत आहेत. यात अनेक लोकांना धमकावून पैसे वसुल केल्याचा संशय असुन तपास सुरु आहे.











