धाराशिव – समय सारथी
भावाचे नाव गुन्ह्यातून कमी करून देतो असे म्हणत 4 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मोबीन नवाज शेख (वय ४१) याच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल असताना, त्यांच्या भावाचे नाव वगळण्यासाठी मोबीन शेख याने सुरुवातीला ५ लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम ४ लाख रुपये निश्चित करण्यात आली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून 17 जुन रोजी पोलीस स्टेशन धाराशिव शहर आवारात पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार, त्याचे वडील व भाऊ यांचे विरुद्ध पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे दाखल गुन्हयातुन भावाचे नाव कमी करण्यासाठी तडजोडी अंती 4 लाख रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले आहे. यातील आरोपी लोकसेवक यांने लाच रक्कम मागितली मात्र स्विकारली नाही.
आरोपीच्या घरझडतीसाठी त्याचे रहाते घरी पथक तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आलोसे यास ताब्यात घेवुन त्याचेविरुद्ध धाराशिव शहर पोलीस स्टेशन, येथे कलम 7 भ्र. प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
तपास अधिकारी व लाच मागणी कारवाई अधिकारी बाळासाहेब नरवटे पोलीस निरीक्षक, सहायक लाच मागणी पडताळणी अधिकारी विजय वगरे, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले. लाच मागणी पडताळणी पथकात पो ना अशिष पाटील, विशाल डोके, सिध्देश्वर तावसकर होते. मार्गदर्शन अधिकारी श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र,पर्यवेक्षण अधिकारी योगेश वेळापुरे,पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी काम पाहिले.