धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहराच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोप होत असुन भाजपचे अभय इंगळे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या सुरस कथा : “मामा-मॅजिक : साखरेतून सोनं” अशी टीका अभय इंगळे यांनी केली आहे.
कधी काळी गडगडाट करत चाललेला तेरणा सहकारी साखर कारखाना.आज तिथं फक्त रखरखीत वाऱ्याचं साम्राज्य.कारखाना बंद पडला? हो, कारण मामाचा व्हिजन वेगळाच होता.”काम करणं सोडलं तर खूपच पैसा वाचतो” ही मामाची धोरणात्मक दूरदृष्टी ! भंगार? ते तर सोन्याचं होतं ! ते पण गायब. म्हणे, “कचरा दुसऱ्याचं – खजिना आपला.”
२५० कोटींची साखर ? कुठं गेली कुणालाच माहीत नाही.साखरेसारखं वितळून गेलं म्हणे…हिशोब विचारला तर उत्तर, “गोड बोललं की लोक विसरतात.” जनतेचा सहकारी कारखाना बंद पडला, आणि मामाने उभा केला खाजगी राजेशाही थाटात! सगळं जनतेच्या पैशातून आणि नाव मामाच्या बिझनेस टॅलेंटचं! आणि हे सर्व शक्य केलं खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी, यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा,ज्यांच्या पुढे “सिंहासन”मधली कथा पण फिकी वाटेल.