धाराशिव – समय सारथी
मातोश्रीने दाखवलेला विश्वास धाराशिव-कळंब विधानसभेवर दुसऱ्यांदा भगवा फडकावून सार्थ ठरवु अशी प्रतिज्ञा आमदार कैलास पाटील यांनी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म स्वीकारला. निष्ठेच्या बळावर पुकारलेल्या या स्वाभिमानाच्या लढ्याला मिळणारा प्रत्येक आशीर्वाद शंभर हत्तीचं बळ देणारा आहे अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात कैलास घाडगे पाटील यांना 87 हजार 488 मते पडली होती तर राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांना 74 हजार 21 मते पडली होती, कैलास पाटील हे 13 हजार 467 मतांनी विजयी झाले होते. सत्ता परिवर्तन वेळी त्यांनी मातोश्री प्रति निष्ठा जपत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. शेतकरी, पीक विमा, मराठा आरक्षण यासह अन्य मुद्यावर त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले, 2024 च्या निवडणुकीत ते उभे असुन महायुतीला अजुन त्यांच्या विरोधात उमेदवार घोषित करता आला नाही. दांडगा जनसंपर्क व थेट लोकांशी नाळ ह्या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत.