धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंह गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काही काम पुरात्तव विभागाच्या वतीने पुर्ण करण्यात आले असुन 21 ऑगस्ट गुरुवार पासुन तुळजाभवानी मातेचे धर्म दर्शन व देणगी दर्शन नियमितपणे चालु करण्यात येत आहे. मुखदर्शन, सिंहासन पुजा, अभिषेक पुजा व इतर धार्मिक विधी नियमितपणे चालु राहतील असे तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा प्रशासन व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी कळविले आहे. मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी.