धाराशिव – समय सारथी
बिअरच्या मोफत बाटल्याच्या माध्यमातून खंडणी वसुली करणाऱ्या एका आरोपी विरोधात वाईन शॉप मालकाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भुम शहरातील ही घटना असून अक्षय गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.
भुम शहरातील इंदिरा सन्स वाईन मर्चंट येथे जाऊन अक्षय गायकवाड या तरुणाने शॉप मालक संदीप केशव कान्होरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. 12 ऑगस्ट रोजी आरोपीने 1 हजार रुपये मागितले. पैसे न दिल्यास वाईन शॉप चालू देणार नाही तसेच फोडून टाकण्याची धमकी दिली व बियरच्या 3 बाटल्या विनामूल्य घेतल्या. यापूर्वीही आरोपीने 2 हजार रुपयांची खंडणी मागितली होती आणि पैसे न दिल्यास 11 बियरच्या बाटल्या खंडणीच्या स्वरूपात घेतल्या होत्या.
वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने 14 ऑगस्ट रोजी भुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि. कलम 308(2), 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.