पालकमंत्री प्रतापराव सरनाईक 2 दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, अनेक कार्यक्रम
धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 14 व 15 ऑगस्ट असे 2 दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह ते विविध बैठक व कार्यक्रम यांना उपस्थितीत राहणार आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक बैठक काम वाटपाचे सूत्र ठरल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी मागील आर्थिक वर्षातील निधीची स्थगिती अधिकृत रित्या अजून उठवलेली नाही त्यामुळे पद्यामागे काय सुरु आहे याची चर्चा रंगली आहे. 15 ऑगस्टची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केल्यानंतर या निधीला स्थगिती देण्यात आली होती.
नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन 4 महिने झाले असून 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी 457 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळालेली आहे. पालकमंत्री सरनाईक हे नेमकी काय भुमिका मांडतात याकडे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री सरनाईक हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याला 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 वाजता भेट देऊन आढावा घेणार आहेत त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती बैठक, नवरात्र उत्सव बैठक आढावा, पवनचक्की कंपनी प्रतिनिधी सोबत बैठक,मराठा समाज भवन जागा निश्चिती संदर्भात बैठक, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विस्थापित पुजाऱ्याना जागा निश्चिती करण्याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या सर्व बैठका धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहेत.