उमरगा – समय सारथी
उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट येथील अभिषेक कालिदास शिंदे याचा 3 महिलांनी संगणमत करून खुन केल्याची घटना उघडकीस आली असून बायपास रोडलगत आरती मंगल कार्यालयाजवळ मृतदेह आढळला आहे. घटनेनंतर जवळपास 15 दिवसांनी त्याच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या तिघींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.
या तिन्ही महिला येरमाळा येथील कालिका कला केंद्रात राहात असल्याची माहिती आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. तिन्ही महिला सख्या बहिणी असून मयत आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे , त्याने यातील आरोपी महिलांना त्रास देत अश्लील प्रकार केले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
उमरगा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) आणि 120 (ब) (कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हत्या प्रेमसंबंधामुळे झाली की इतर कोणत्या वादातून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू आहे आणि या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.