धाराशिव – समय सारथी
पळसप येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी वैभव चंद्रकांत लाकाळ यांनी वडील चंद्रकांत मदन लाकाळ (वय 65) यांना रामपाल महाराज यांच्या भक्तीबाबत वाद झाल्याच्या कारणावरून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे चंद्रकांत लाकाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे पुत्र प्रमोद चंद्रकांत लाकाळ (वय 29) यांनी 9 ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भा.दं.सं. कलम 103(3) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.